पर्यटन

शिरसाळा मारोती मंदिर

 

शिरसाळा मारुती मंदिर हे बोडवड तालुक्यात येते. शिरसाळा गावाच्या दर्शनी भागाकडून मंदिर आहे. हे मंदिर बोडवड शहरापासून १० की. मी. अंतरावर आहे. शिरसाळा मारुती मंदिर जाण्यासाठी आपण बोदवड, मुकताईनगर, भुसावळ, वरणगाव, मलकापुर, जामनेर येथून जाऊ शकता. याठिकाणी स्थानिक तसेच बाहेररील गावातील लोक आपला मान (मागणे) मानलेला असल्यास तो पूर्ण करण्यासाठी येतात व तो त्या मंदिर आवारातच जेवण तयार करून मारुती रायाला नैवेद्य दाखवून त्याठिकाणी जेवण करून मानलेला मान हा पूर्ण केला जातो. या मंदिरातील मारुतीची मूर्ती ही स्वयंभू मूर्ती आहे. या मंदिराबाबत अशी ही आखयाईका आहे की या मंदिराला कळस नाही व कळस बांधले असता तो टिकत नाही. मंदिरास जाण्यासाठी बोडवड शहरापासून रिक्षा हे वाहन मिळू शकते त्याचा बरोबर स्वतचे वाहन नेल्यास त्याठिकाणी मोठे वाहन तळ उपलब्ध आहे.  



संत मुकताबाई मंदिर

 

वारकरी परंपरेतील मुक्ताबाई किंवा मुक्ता संत होत. मुकताबाईचा जन्म देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला होता आणि ज्ञानेश्वर महाराज जे पहिले वारकरी संत होते त्यांच्या त्या धाकट्या बहिण होत. मुक्ताबाईंनी आयुष्यभरात  ४१  अभंग लिहिले.

मुकताबाई मंदिर हे मुकताईनगर शहाराजवळील  कोथळी गावात येते. हे मंदिर मुकताईनगर शहरापासून अवघ्या ३ की. मी. अंतरावर आहे. मुकताबाई मंदिर जाण्यासाठी आपण मुकताईनगर, बोदवड, भुसावळ, वरणगाव, मलकापुर, जळगाव येथून जाऊ शकता. मुकताबाई ह्या संत असल्याने याठिकाणी एकादशी च्या दिवशी यात्रा असते व याठिकाणी स्थानिक तसेच बाहेरील गावाची लोक फार मोठ्या प्रमाणावर येतात.