विभाग

बोदवड नगरपंचायतीचे अनेक विभाग आहेत जे की नागरिकांना चांगल्या प्रशासकीय सेवा देण्यासाठी बांधील आहेत. त्यांची खालील प्रमाणे थोडक्यात ओळख..


सामान्य प्रशासन विभाग

सामान्य प्रशासन विभाग त्यांचे कार्यालय प्रशासन व्यवस्थापित करते आणि नागरिकांना विभागीय सेवेव्यतिरिक्त इतर गोष्टींवर लक्ष ठेवतात.


लेखा विभाग

लेखा विभाग अनेक विभागांकडून दररोज संग्रह, पंचायतीचा खर्च, शासनाकडून प्राप्त निधी यासारख्या पंचयातीचे लेखा व्यवहार व्यवस्थापित करतो व तसेच खाते कामकाज सांभाळून ठेवणे इ.


आरोग्य विभाग

आरोग्य विभाग शहरातील साफसफाईची कामे सांभाळतो, जसे की दररोज रस्ते साफ करणे, दररोज नाल्यांची साफसफाई करणे, डासांना मारण्यासाठी धुरळणी करणे इत्यादी कामे आरोग्य विभागामार्फत केली जातात.


नगररचना विभाग

नगररचना विभाग रस्ते, शहर नियोजन, भूखंड आराखड्यावरील मंजुरी नियोजन, इमारत परवानगी इत्यादींची पडताळणी करणे इ. कामे नगररचना विभागामार्फत केली जातात.


सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते, ओपन ड्रेन, भूमिगत गटार, नगरपंचायत अंतर्गत असलेल्या इमारती, उद्याने इत्यादीसारख्या शहराच्या पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम करतात.


आस्थापना विभाग

आस्थापना विभाग, कर्मचार्‍यांची भरती करणे, कर्मचार्‍यांचे तपशील सांभाळणे, सेवेचे रेकॉर्ड ठेवणे, कर्मचार्‍यांची उपस्थिती व्यवस्थापित करणे, वेतनश्रेणी, कर्मचार्‍यांशी संबंधित सेवा इत्यादी आस्थापना विभाग व्यवस्थापित करतो.


करनिर्धारण विभाग

कर संकलन विभाग नागरिकांकडून कर वसूल करतो. तसेच शासनाच्या नियमावलीनुसार शहरातील मालमत्तांचे करनिर्धारण करणे, कर निश्चित करणे, मालमत्ता हस्तांतरण इ. बाबतचे कामकाज करनिर्धारण विभाग करते.